तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगराला जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार झालेला आहे. याच कारणामुळे विलासराव देशमुखांचा सन्मान करत या फ्रीवेला विलासरावांचे नाव देण्यात येत आहे.
या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील पी डीमेलो रोड ते चेंबूर असा नॉनस्टॉप प्रवास करता येतो. या मार्गामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे. दक्षिण मुंबईत अनेक महत्वाची कार्यालये असून या भागात लाखो नागरिक दररोज ये-जा करत असतात. यामुळे मुंबईतून चेंबूरहून थेट नवी मुंबईत जाणे सोयीस्कर झाले आहे. त्याच प्रमाणे दक्षिण मुंबईतून पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी फ्रीवेचा मोठा उपयोग होत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ४४ टक्के काम टक्के पूर्ण झाल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. ७२० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘स्टार प्रवाह’ या उद्देशाने नांदेड ते जालना मार्गाचे सुमारे सात हजार कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा-
त्याच प्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडे दहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांचे काम सुरू आहे. याबरोबच दोन किलोमीटर लांबीच्या दोन पूलांचीही बांधणी करण्यात येत आहे. हे पुलांसाठी ५९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हा भुयारी मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच पुण्यावरून चक्राकार मार्गाची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या १६ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. या मार्गामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येवर मात करता येईल, अशी आशा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times