कोल्हापूरमधील फडके प्रकाशनने (Phadke Prakashan) () यांच्याविषयी आक्षेपार्ह मजूकर प्रसिद्ध केल्याबद्दल या प्रकाशन संस्थेवर शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा या प्रश्नात छत्रपती घराण्याचा वारस म्हणून मला उतरावे लागेल असा इशारा खासदार (MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिला आहे. खासदार संभाजीराजे यांनी यासंबंधीचे पत्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पाठविले आहे. ( should file a case against phadke prakashan appeals mp sambhajiraje chhatrapati)
फडके बुक हाऊसने प्रसिद्ध केलेल्या ‘मराठयांचा राजकीय इतिहास’या गाईडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूर प्रकाशित केला आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी हा प्रकार निदर्शनास आणले. त्या गाईडवर बंदी घालावी तसेच प्रकाशनावर फौजदारी दाखल करावा अशी मागणी केली होती. विद्यापीठाने फडके प्रकाशनच्या त्या पुस्तकावर बंदी घातली आहे.
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी कुलगुरू शिर्के यांना पत्र देऊन फडके प्रकाशनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याविषयी कळविले आहे. त्या पत्रात म्हटले आहे, ‘इतिहास अभ्यासकांनी सारा प्रकार माझ्या निदर्शनास आणला. याबाबत फडके प्रकाशनने माफीनामा दिला असला तरी ही केवळ एकच चूक गाईडमध्ये दिसत नाही. गाईडमध्ये असंख्य चुका आहेत. मराठयांचा तेजस्वी इतिहास पुसण्याचे काम केले जात आहे. इतिहासाचे कोणतेही पुरावे अथवा संदर्भ न देता दिशाभूल करणारे लिखाण त्यात आहे. त्यातून भावी पिढयासमोर चुकीचा इतिहास जाणार हे वास्तव आहे. त्याला वेळीच पायबंद घालण्यासाठी फडके प्रकाशनवर शिवाजी विद्यापीठाने फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा या प्रश्नात अन्यथा या प्रश्नात छत्रपती घराण्याचा वारस म्हणून मला उतरावे लागेल.’
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times