सोलापूर नगरीत या पूर्वी १६ वे १९९७ साली विहंग मंडळाने आयोजित केले होते, या संमेलनासाठी त्यावेळी मनेका गांधी उपस्थित होत्या. या संमेलनाचे आयोजन करण्यासाठी त्यावेळी प्रा.डॉ. निनाद शहा हे प्रमुख होते. राज्याच्या वन विभागाचे माजी सचिव तथा तत्कालीन जिल्हाधिकारी मा. प्रवीणसिंह परदेशी हे त्या संमेलनाचे मुख्य संयोजक होते.त्यानंतर तब्बल २३ वर्षानंतर सोलापूर येथे संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापुरातील प्रा. डॉ. निनाद शाह यांची निवड कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत करण्यात आली.
संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.निनाद शहा हे सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयातून प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून गेल्या तीन दशकांपासून पक्षिमित्र चळवळीत सक्रीय आहेत.
संमेलनाचे आयोजन,अनेक संमेलनांना उपस्थिती, सोलापूर येथील नान्नज माळढोक अभयारण्य यावर अभ्यास, सोलापूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरण व वन विभागाच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून कार्य केलले डॉ. शहा हे महाराष्ट्रातील पक्षिमित्र चळवळीतील अग्रणी आहेत.सोलापुरात पुन्हा होत असलेल्या संमेलनासाठी आयोजकांना त्यांचे मार्गदर्शन लाभत असून ते या संमेलनाचे महाराष्ट्र पक्षिमित्र समन्वयक सुद्धा आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
सोलापूर येथील संमेलनाची नोंदणी तसेच सादरीकरण व स्मरणिका लेख पाठविण्यासाठी नोंदणी ऑनलाईन पद्धीतीने सुरु असून पक्षीमित्रांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपल्या पक्षिमित्रांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयोजक डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून सदर आयोजन करण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी ९४२३५९३४७५ किंवा ९७६४९३४४४० या मोबाईलवर व्हाट्सअप करा किंवा सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत संपर्क साधावा असं आवाहन महाराष्ट्र पक्षिमित्र अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केलंय.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times