नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार (Nana Patole) यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट (offensive facebook post) करणाऱ्या युवकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. कृणाल मोहनराव दहिवाले (वय ३४ रा. नाईक रोड,महाल),असे अटकेतील युवकाचे नाव आहे. कृणाल याने २७ फेब्रुवारीला नाना पटोले यांच्याविरुद्ध फेसबुक व अन्य समाजमाध्यंमावर आक्षेपार्ह पोस्ट केली. ( against )

काँग्रेस कार्यकर्ते आकाश पितांबर तायवाडे (वय ३१ रा. गोपालनगर) यांनी प्रतापनगर पोलिसांत या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या पोलिस निरीक्षक व्ही.बी.जाधव, उपनिरीक्षक व्ही.बी.पवार, हेडकॉन्स्टेबल चंद्रमणी सोमकुवर, शिपाई मनोज निमजे, मिलिंदकुमार मेश्राम, विशाल घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेऊन कृणाल याला अटक केली. पोलिसांनी त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

क्लिक करा आणि वाचा-

यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा कृणाल दहिवाले हा हा सौंदर्य प्रसाधानाच्या एजन्सीत प्रतिनिधी आहे. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही,असे पोलिसांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here