कोल्हापूर: केवळ तेरा वर्षाच्या एका मुलाने सात वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. ( )

वाचा:

जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पैकी बसुदेव धनगरवाडा येथी ही घटना घडली आहे. गावातीलच एका तेरा वर्षीय मुलाने दुपारी पीडित सात वर्षाच्या बालिकेस शेणाची पाटी उचलण्यास मदत कर असे सांगून घरामध्ये नेले. त्यानंतर घराचे दरवाजे बंद करून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या बालिकेने आईला या प्रकाराबाबत माहिती दिली.

वाचा:

या घटनेची फिर्याद पीडित बालिकेच्या आईने ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या बालकास ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन बालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तो सातवीच्या वर्गात शिकत आहे. या गंभीर प्रकारानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दिवसभर गर्दी केली होती. या घटनेने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here