मुंबई– बॉलिवूडमध्ये नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार त्यांची नावं बदलतात. काहीवेळेस बोलायला अवघड वाटू नये किंवा अगदी लगेच आठवण राहावी म्हणून देखील नावामध्ये बदल करण्यात येतो. बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. परंतु, त्यांचं खरं नाव मात्र प्रेक्षकांना माहीत नाही. कदाचित तुमच्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव देखील बदललेलं असू शकतं. चला मग जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल.

बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा यांचं नाव देखील बदललेलं आहे. आजही रेखा यांच्यावर चाहते तितकंच प्रेम करतात जेवढं ते यापूर्वी करत होते. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत कुठेही कमतरता आलेली नाही. रेखा यांचं खरं नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे. त्या दक्षिण भारतातील आहेत. काही व्यक्तिगत कारणांमुळे त्यांनी त्यांचं आडनाव सोडलं होतं.

श्रीदेवी
बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अभिनयाचे चर्चे आजही होताना दिसतात. त्यांनी जणू प्रेक्षकांना आपलंस करून घेतलं. प्रेक्षक त्यांना घरातील एक व्यक्ती मानत. ज्या श्रीदेवीचे भारतात आणि विदेशातही लाखो चाहते आहेत त्यांचं नाव मात्र त्यांनी बदललं होतं. श्रीदेवी यांचं खरं नाव यम्मा यंगर अय्यपन’ होतं. पण बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी त्यांनी हे नाव बदललं.

जिच्या गालावरील खळ्यांचा संपूर्ण प्रेक्षकवर्ग वेडा होता त्या प्रीती झिंटाने देखील तिचं नाव बदललं होतं. जाहिरातींमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव ‘प्रीतम सिंह’ आहे. या नावावरून अंदाज लावणं कठीण आहे की हे मुलाचं नावाचे की मुलीचं.

‘कबीर सिंह’ मधून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री कियारा अडवाणी देखील या अभिनेत्रींच्या यादीत आहे. आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव आलिया अडवाणी आहे. सलमान खानच्या सांगण्यावरून तिनेही तिचं नाव बदललं.

बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी हिनेदेखील तिच्या नावात बदल केला आहे. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी तिने नावात बदल केला. तिचं खरं नाव ‘अश्विनी शेट्टी’ आहे. त्यानंतर तिने ते बदलून शिल्पा शेट्टी केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here