विद्याने एका मुलाखतीमध्ये केलेल्या खुलाश्याप्रमाणे, ती आईवडिलांना चित्रपट दाखवायला घेऊन गेली आणि स्वतः मात्र चित्रपटगृहाच्या बाहेर त्याची वाट पाहत उभी राहिली. चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान तिला तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रियांची प्रचंड भीती वाटत होती. पण जेव्हा तिचे आईवडील चित्रपट पाहून बाहेर आले. तेव्हा तिचे वडील टाळ्या वाजवत होते. त्यांनी म्हटलं, ‘मी माझ्या मुलीला संपूर्ण चित्रपटात कुठेही पाहिलं नाही.’ तर त्याउलट विद्याची आई मात्र रडत होती. तिच्यासाठी तिच्या मुलीला पडद्यावर मरताना पाहणं अत्यंत कठीण होतं. आईच्या म्हणण्याप्रमाणे तिला चित्रपटात कुठेही विद्या किळसवाणी वाटली नाही. आईचं हे वक्तव्य विद्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
विद्याने पुढे म्हटलं, ‘आमच्या घरात आम्हाला कधीच बंधनात ठेवलं गेलं नाही. आम्ही मुली आहोत म्हणून आमच्या आईवडिलांनी आमच्यावर नियम लादले नाहीत. आम्हाला कोणतीच गोष्ट करण्यापासुन कधीही अडवलं गेलं नाही. माझी बहीण माझ्यापेक्षा ४ वर्ष मोठी आहे. आम्ही दोघीनी आम्हाला जे पाहिजे तेच केलं. जेव्हा आम्हाला आमच्या पालकांची भीती वाटायची तेव्हाही माही त्यांच्यासोबत खरं बोलायचो. याचं जास्तीच श्रेय आमच्या बाबांना जातं. ते नेहमी आमच्याशी मित्रासारखं वागले. ते आम्हाला थांबवू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times