मुंबई: राज्याचे (Ajit Pawar) यांनी राज्याचा २०२१-२२ वर्षाचा () मांडला. त्यानंतर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडले. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की एखाद्या भागाचा, असा सवाल करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. त्यावर अर्थमंत्री अजित पवार विरोधकांवर चांगलेच भडकले. (ajit pawar responded to the leaders on the budget)

मी सन २००९ ते २०१४ पर्यंत एकूण ४ अर्थसंकल्प मांडलेले आहेत. याबरोबर जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी देखील अर्थसंकल्प मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणे हे आमच्यासाठी नवीन नाही. यावेळी आमच्या सगळ्यांच्या समोरच आव्हान होतं. कराद्वारे येणारा पैसा कमी झाला आहे. केंद्र सरकारकडून अजूनही ३२ हजार कोटी राज्याला मिळालेले नाहीत. आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत अर्थसंकल्प मांडला आहे, असे अजित पवार म्हणाले.

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली, अशी टीका विरोधकांनी केली आज केली. त्यावर अर्थमंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार चांगलेच भडकले. शून्य टक्के व्याज ही घोषणा काही भाजपची नाही. भाजपची काय मक्तेदारी आहे का?, आम्हाला काही कळतच नाही का?, असे सांगत त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, असे अजित पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

आम्ही काय साधूसंत नाहीत, असे सांगत जनतेला सरकारबद्दल आपलेपणा वाटावा असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आम्ही जनतेला आवडेल असा कार्यक्रम देणार आहोत. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने आमचा विचार केला पाहिजे, असे पवार म्हणाले.

हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की मुंबईचा, या विरोधकांच्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘नांदेड, पुणे जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा कार्यक्रम हा काय मुंबई महापालिकेत आहे का?, मुंबई ही देशाची राजधानी आहे. मुंबईकडेही लक्ष द्यायला पाहिजे’.

क्लिक करा आणि वाचा-

महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळे केली नाहीत, असे विरोधक सतत म्हणत आहेत. मात्र, आम्ही ती करणार आहोत आणि तसे म्हटलेही आहे. पण ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांचे त्यांना लखलाभ, असे अजित पवार म्हणाले. विदर्भाची काळजी केवळ त्यानांच आहे का, मग आम्ही काय बिन काळजीचे आहेत का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here