आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडा. आज इथे बॅरिकेड्स तोडले तर उद्या दिल्लीतील तोडू शकाल. ज्यांना भीती वाटते त्यांनी येऊ नका. हे तर फक्त ३ कायदे आहेत. गप्प बसले तर आणखी ४० कायदे येतील. सरकार चर्चा करण्यापासून पळ काढत आहे, असा सवालही टिकैत यांनी केला.
‘आगीत तेल टाकून नामानिराळे’
राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार आणि कृषी कायद्यांविरोधात हल्लाबोल केला. केंद्र सरकार स्वतः आगीत तेल टाकते आणि नामानिराळे होऊन जनतेनेच आग लावल्याचा दोषारोप करते. हे निवडणुका असेच जिंकत नाहीत, ते काहीही करतात. कुठल्या राजकीय पक्षाचे सरकार असते तर गोष्ट वेगळी होती. पण हे तर दरोडेखोर आहेत, असा आरोप टिकैत यांनी केला.
संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या शेतकरी सभेत मध्य प्रदेशातील श्योपूर, शिवपुरी, मुरैना, अशोक नगरसह राजस्थानमधील बारां, कोटा, सवाई माधोपूरसह सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील शेतकरीही आले होते. शेतकरी सभेमुळे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. सभेच्या ठिकाणापासून ते शहरात ठिकठिकाणी ५०० ते ६०० पोलिस आणि अधिकारी तैनात होते.
राजस्थान सीमा सील केली
शेतकरी सभेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने राजस्थान सीमा सील केली होती. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी येऊ शकले नाही. यामुळे या सभेला शेतकरी नेत्यांना अपेक्षित इतकी गर्दी होऊ शकली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times