नवी दिल्लीः पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम या ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेश अशा ५ विधानसभा निवडणुकांची घोषणा ( ) काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने केली. आता या राज्यांमधील निवडणूकपूर्व सर्वेक्षण (Times Now-C-Voter opinion poll) समोर आले आहे. टाइम्स नाउ – सी व्होटर यांनी मिळून हा पोल केला आहे.

तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते. दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे. आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे. केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते. आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची दमदार कामगिरी पण…

पश्चिम बंगालमध्ये ( ) भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या ( ) तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय.

तामिळनाडूत काँग्रेसप्रणित यूपीए सत्तेत येण्याचा अंदाज

तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही.

आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार

आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.

पुदुच्चेरीत एनडीए १६ ते २० जागांवर आघाडी घेईल

पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.

केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत

सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here