वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी सोमवारी सायंकाळी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. औरंगाबादनंतर नगर जिल्हाही रेड झोनमध्ये आला आहे. त्यामुळे नगरसंबंधी या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले होते. मात्र, नगरला तूर्त सारखे उपाय न करता अन्य उपाययोजना कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली व त्याच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वाचा:
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना भोसले यांनी सांगितले की, ‘आढावा बैठकीत असे आढळून आले की, सध्या शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत आहेत. यासंबंधीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून तेथे गर्दी होत आहे. त्यामुळे १४ मार्चपर्यंत पोलिसांच्या मदतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी ४४ विवाह सोहळे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या प्रत्येक ठिकाणावर पोलीस लक्ष ठेवणारआहेत. जेथे लग्न आहे, तेथे सकाळीच पोलीस दाखल होतील. संबंधितांना केवळ पन्नास व्यक्तींना प्रवेश देण्याची सूचना करून सोहळा संपेपर्यंत पोलीस तेथेच थांबून चित्रिकरण करतील. जर नियम मोडला गेला तर संबंधितांना दंड केला जाईल. याशिवाय हॉटेलवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांना पन्नास टक्के क्षमतेनेच ग्राहकांना प्रवेश देण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलिसांमार्फत अचानकपणे तपासणी केली जाणार आहे. नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’
वाचा:
शाळा-महाविद्यालये यासंबंधी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पाहणी करून तीन दिवसांत अहवाल देणार आहे. त्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही, त्याबद्दल निर्णय होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times