मुंबई: राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली असून राज्यात आज ८ हजार ७४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ९ हजार ६८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात आणखी २२ रुग्ण दगावले असून आतापर्यंत करोनामुळे राज्यात ५२ हजार ५०० जणांना प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, राज्यात आज अनेक दिवसांनंतर नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली असून हा काहीसा दिलासा ठरला आहे. ( Latest Update )

वाचा:

राज्यात गेले काही दिवस सातत्याने रुग्णसंख्या नवा टप्पा ओलांडत आहे. आधी दहा हजारचा टप्पा पार केल्यानंतर रविवारी राज्यात ११ हजारावर नवीन करोना बाधित आढळले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली होती. आज हा आकडा कमी होईन ९ हजारच्या आत आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने होत असलेली वाढ ही धोक्याचे संकेत देणारी ठरली आहे. हा आकडा आता लाखाच्या अगदी जवळ जाऊन पोहचला आहे.

वाचा:

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडलेल्या ५२ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.३६ टक्के एवढा आहे. आज राज्यात ८ हजार ७४४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ९ हजार ६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ७७ हजार ११२ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९३.२१ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६९ लाख ३८ हजार २२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख २८ हजार ४७१ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४१ हजार ७०२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

जिल्ह्यात १९ हजार अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात सध्या करोनाचे ९७ हजार ६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १९ हजार ३० अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर जिल्ह्यात हा आकडा वाढून आता १२ हजार २९१ इतका झाला आहे. त्यानंतर जिल्ह्यात चिंता वाढत चालली आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत ही संख्या सध्या ९ हजार ३७३ इतकी झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here