विवाहित परिचारिकेला बेशुद्ध करून तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हीडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन टेक्निशियनने हॉस्पिटलमध्येच तिच्यावर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बजाजनगर पोलिस स्टेशनअंतर्गत एका नामांकित हॉस्पिटलमध्ये घडली.
या ३७वर्षीय परिचारिकेच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी अत्याचाराचा दाखल करून टेक्नशियनला अटक केली. अमरदीप क्रिष्णाजी मंडपे (वय ४०) असे त्याचे नाव आहे. अमरदीपला पत्नी व दोन अपत्ये आहेत. परिचारिकेचा पती नागपूरबाहेरील खासगी कंपनीत कार्यरत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये अमरदीपने परिचारिकेला हॉस्पिटलमधील एका खोलीत भेटायला बोलाविले. तेथे शीतपेयातून तिला गुंगीचे औषध दिले. परिचारिका बेशुद्ध झाली. त्यानंतर अमरदीपने मोबाइलद्वारे तिचे अश्लील छायाचित्र काढले. व्हिडीओ तयार केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो करायला लागला. वर्षभरापासून तो परिचारिकेचे शोषण करीत होता. दोन दिवसांपूर्वी परिचारिकेने बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अमरदीपला अटक केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times