मुंबईः राज्यातील विरोधी पक्षनेते यांच्या पत्नी विविध विषयांवरील खोचक व टीकात्मक ट्वीटमुळं सतत चर्चेत असतात. महिला दिनानिमित्त गायलेल्या एका गाण्यामुळं त्या सध्या चर्चेत आल्या आहे. त्यांच्या गाण्यावर टीका व कौतुक दोन्हीही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी अमृता यांनी गायलेल्या गाण्याचं कौतुक केलं आहे. ( praises for a song)
महिला दिनाचं औचित्य साधत अमृता फडणवीस यांनी एक नवीन गाण प्रदर्शित केलं आहे. ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी,’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणं नाट्य संगीतावर आधारीत आहेत. अमृता फडणवीस यांच्या या गाण्यावर रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
‘काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करुनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. पण, अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times