नाशिक: महापालिकेची स्थायी समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यात सत्तारुढ भाजपला यश आले आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे यांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली आहे. आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ( Municipal Corporation )

शिवसेनेने या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बहिष्कार टाकला. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य सभागृहात आलेच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तसेच भाजपला समर्थन करणारे मनसेचे सदस्य उपस्थित होते. गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने अखेरीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी गीते यांची निवड झाल्याचे घोषित केले.

वाचा:

स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांपैकी ८ सदस्य भाजपचे असून मनसेने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित होता. शिवसेनेने सुरुवातीला प्रतिष्ठेचा प्रश्न करत स्थायी ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीने साथ दिली नाही. त्यामुळे घोडेबाजार वाढत असल्याचे कारण देऊन शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. अखेरीस आज भाजपच्या गीते यांच्या निवडीवर बिनविरोध शिक्कामोर्तब करण्यात आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here