वाचा:
विधान भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. गरजेनुसार प्रशासनानं मर्यादित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं शेख यांनी सांगितलं. मुंबईत देखील रुग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बऱ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही बेफिकीरी दिसून येत आहे. मुंबईत तीन ते चार नाइट क्लबवर कारवाई झाली आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास सर्वात प्रथम मुंबईतील नाइट क्लब बंद केले जातील. त्यानंतरही रुग्ण वाढत राहिल्यास नाइट कर्फ्यू किंवा अंशत: लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असंही शेख यांनी सांगितलं.
वाचा:
‘मास्क न घालणाऱ्या नागरिकांना दंड केला जात आहे. मात्र, बेफिकिरी वाढत राहिल्यास समुद्र किनारे व गेटवे सारखी गर्दीची ठिकाणे बंद करावी लागतील. त्यामुळं लोकांनी काळजी घ्यावी,’ असं आवाहनही अस्लम शेख यांनी केलं.
राज्यात काल नव्या करोना रुग्णांच्या संख्येने ११ हजारांचा आकडा पार केला. सोमवारी एकूण ११ हजार १४१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात एकूण ६ हजार १३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ९७ हजार ९८३ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ३१९ इतकी झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times