सुरेश कौलगेकर । सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिबट्या विहिरीत अथवा तळीमध्ये पडण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. आज भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या भर वस्तीतील विहिरीत पडल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. (Leopard Falls into Well)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यातील परुळे बाजार येथील मनोहर सामंत यांच्या घराजवळील विहिरीत पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला होता. भक्ष्याच्या शोधात असणारा हा बिबट्या भरवस्तीतील एका विहिरीत पडला. सदर घटना ग्रामस्थांना कळताच बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

वाचा:

गेल्या काही दिवसांपासून परूळे परिसरात या बिबट्याची मोठी दहशत होती. बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. अनेक पाळीव गुरे व पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना मृत केल्याच्या घटना आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

वाचा:

ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. वनविभागाच्या पथकाने परुळे येथे दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद केलं. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. सदर बिबट्या तीन वर्षे वयाचा आहे. तसेच तो नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here