जयंत सोनोने ।

टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा फटका आधीच शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबिन, उडीद, मुंगाचे बोगस बियाण्याप्रमाणेच यंदा अनेक शेतकऱ्यांनी टाकलेले काद्यांचे बीज उगवलेच नसल्याने पुन्हा हेलपाटे घेवून कांदा लावगड केल्यानंतर आता कांद्यावर विविध रोगांनी हल्ला चढवला आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून परंपरागत पीक पद्धतीत शेतकऱ्यांना नाईलाजाने बदल करावा लागत आहे. अन‌् त्याचाच परिणाम उन्हाळी कांद्यावर दिसून येत आहे. यंदा हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषंगाने रोगांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सध्या कांद्यावर करपा, मुळकूज, फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वाचा:

दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीस व रोगराई अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा उशिराने कांदा लागवड करण्यात आली. अनेका शेतकऱ्यांनी बँका व इतर जुळवाजुळव करून काद्यांची लागवड केली. यंदा काद्यांचा चांगला भाव असल्याने भविष्याचे नियोजन करून अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले. मात्र वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक अडचणीत टाकले आहे. कांद्यावर सध्या मोठ्या प्रमाणात करपा, मुळकूज, फुलकिडीचा प्रादुर्भाव आढत आहे. शेणखत व इतर रासायनिक औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. करपा व कुळकुज रोगाच्या प्रदुर्भावामुळे काद्यांची वाढ खुंटली आहे. सोबतच कांद्याच्या पालीचा गुंडाळा होत आहे. एकरी हजारो रुपयांचा खर्च करून सुध्दा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

…अशी घ्यावी काळजी

  • कांदा मूळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सि क्लोराइड ३ ग्रॅम/लिटर किंवा स्ट्रेप्टोसायकलिंन २ ग्रॅम/१० + हुमिक १ ग्रॅम/ लिटर पाणी घेऊन वाफ्यांमध्ये आवळणी (ड्रेनचिंग) असला सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
  • अझोस्ट्रोबिन ०.५ मिली किंवा टेब्युकोनाझोल (फोलिक्युअर) १ मिली + त्यामध्ये फिप्रोनील १ मिली प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर ५ ते ६ दिवसानंतर म्यानकोझेब + कार्बेन्डाझिम (साफ) या बुरशी नाशकाची २ ग्रॅम/लिटर + डायमेथोएट (रोगर) १.५ मिली + ०.५ मिली स्टिकर या प्रमाणे फवारणी करावी.
  • दोन महिन्याच्या आतील कांदा पिक असल्यास पात वाढीसाठी १९:१९:१९ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम/ लिटर या प्रमाणात फवारणी करावी. त्यानंतर दुसरी फवारणी १३:००:४५ ५ ग्रॅम/लिटर त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची २.५ ग्रॅम/ लिटर याप्रमाणे करावी.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here