नाशिक: कोरोना () वाढता प्रसार वेळीच रोखता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद () ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे येत्या १५ मार्चनंतर नाशिकमध्ये आणि इतर कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजारांपेक्षा अधिक बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. यासाठीच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे नवे निर्बंध लागू करण्यासंदर्भातील एक पत्रकही जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे.

१५ मार्चनंतर लग्नसमारंभांना बंदी

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमांनुसार किंवा निर्बंधांनुसार येत्या १५ मार्चपासून मंगल कार्यालये, हॉल्स, लॉन्स आणि इतर ठिकाणी ठिकाणी लग्न समारंभ करता येणाक नाहीत. तसेच इतरही गर्दी जमा होईल असे कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत मंगल कार्यालयांच्या मालकांनी कोणालाही आपला हॉल देऊ नयेत अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

रेस्टॉरंट्स, बारसाठीही निर्बंध

नाशिक जिल्ह्यातील रेस्टॉरंट्स, खाद्यगृहे, बार आणि परमिट रुम सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र, या ठिकाणी आसन क्षमतेच्या ५० टक्के इतक्याच ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे करोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. रेस्टॉरंट्समधून होम डिलेव्हरी रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मंदिरे, धार्मिक स्थळांसाठी सूचना
धार्मिक स्थळे, मंदिरे सकाळी सात ते सायंकाळी सात असे १२ तास सुरु राहणार आहेत. त्याच प्रमाणे धार्मिक विधीसाठी एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाकारण्यात आली आहे. या बरोबरच शनिवारी आणि रविवारी सर्व मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here