अमरावती: जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर-परतवाडा शहरातील परतवाडा बसस्थानक परिसरात आज, मंगळवारी सकाळी ट्रॅव्हल्स चालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर तुफान दगडफेक झाली. या प्रकारामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

जय बजरंग ट्रॅव्हल्सचे संचालक राजेश जानराव भोंडे व नीलेश जानराव भोंडे यांनी दुर्गाशांकर अग्रवाल यांच्या मालकीच्या श्रीराम ट्रव्हल्सच्या बसवर तुफान दगडफेक केली. परतवाडा बसस्थानकासमोर वाहन उभे असताना घडलेल्या घटनेमुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन ट्रॅव्हल्स चालकांमधील वादाने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

श्रीराम ट्रॅव्हल्सच्या बसचा चालक शे. कलीम शे. रहीम (वय ५५) व वाहक अफसर शमशेर खाँ हे दोघे बस अमरावतीसाठी घेऊन जात असताना, अचानक जय बरजंग ट्रॅव्हल्सची बस समोर उभी केली. तर दुसरी बस त्या बसच्या मागील बाजूस उभी केली. त्यानंतर श्रीराम ट्रॅव्हल्सच्या बसवर दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. चालक शे. कलीम यांनी परतवाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून राजेश जानराव भोंडे व नीलेश जानराव भोंडे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here