मुंबईः मृत्यूप्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात विरोधी पक्षनेते यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे थेट नाव घेत आरोप केला आहे. तसंच, त्यांना अटक करण्याची मागणीही केली आहे. आज यामुद्द्यावरुन सभागृहात चांगलाच गदारोळ माजला आहे.

सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांना आधीपासून ओळखत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गाडी गुन्ह्यासाठी वापरली होती ती चार महिने सचिन वाझेंकडे होती हे त्यांनी लपवलं आणि हिरन यांना ते आधीपासून ओळखत होते हेही लपवले, त्यामुळं सचिन वाझे यांची ३०२ ची चौकशी होत राहील, मात्र आयपीसी २०१ अंतर्गंत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पण आमच्या लक्षात आलं, सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकं लोक अडचणीत येऊ शकतात, अनेक नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो तेव्हा गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना बाजूला करण्याचं कबूल केलं. पण मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय ते त्यावरुन हे बदलले मात्र सचिन वाझेला यांना दूर करणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे की सरकार त्यांना पाठीशी घालतंय आणि ते शोधण्याची गरज आहे., अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच, सचिन वाझेंना पकडलं तर ते कोणाकोणाची नावं सांगेल या भीतीने हे सरकार त्याला पाठीशी घालतंय, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे हे API आहेत. त्यांना वाचवण्यासाठी इतका फोर्स का लावताय? सचिन वाझे हे सभागृहापेक्षा मोठे आहेत का? विरोधी पक्षनेत्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हा घाबरणारा विरोधी पक्षनेता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जी इनोव्हा गाडी होती, ती मुंबईतच आहे, त्या गाडीची माहिती मिळाल्यास, मी माधमांसमोर घेऊन येईन, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here