अन्वय नाइक प्रकरणी महाराष्ट्र पोलिस अतिशय चांगले काम करत आहेत. मात्र असे असतानाही या प्रकरणात महाराष्ट्राच्या पोलिसांचे तोंड काळे झाले असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे. हे अतिशय दु:खदायक आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी गृहखातेच सांभाळले आहे. आणि तेच महाराष्ट्र पोलिसांबद्दल असे बोलतात. याचा मी निषेध करतो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सरकारच्या या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. या प्रकरणी विधानसभेत गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. आज विविध मुद्यांवर झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज एकूण ८ वेळा स्थगित करावे लागले.
क्लिक करा आणि वाचा-
काय होते प्रकरण?
अन्वय नाईक यांनी सन २०१८ मध्ये अलिबाग येथील त्यांच्या घरात फाशी लावून घेतली. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्याकडून काम करवून घेऊन त्या कामाचे पैसे दिले नाहीत, असा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी आणि इतरांना ४ नोव्हेंबरला अटकही केली होती.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times