म. टा. प्रतिनिधी,

वढू खुर्द येथील माने वस्ती परिसरात मुलानेच आईचा प्रेयसीसोबत मिळून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर उसण्यापैशासाठी एका व्यक्तीने खून केल्याची मुलाने पोलिसांकडे खोटी फिर्याद दिली होती. पण, पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्या मुलास अटक केली. सतत होणारा वाद व प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे त्याने खून केल्याचे समोर आले आहे. (with the help of his the boy takes away the life of his mother)

सुशिला राम वंजारी (वय ३८, रा. माने वस्ती, वढू खुर्द, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा विशाल राम वंजारी (वय १९) याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याची नॅन्सी गॅबेरिअल डोंगरे (वय २६) हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलिसांना माने वस्ती येथे एका महिलेचा खून झाल्याची माहिती मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मिळाली. त्यांनी जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिलेची ओळख पटली. तसेच, तिचा मुलगा विशाल याने उसण्या पैशातून एका व्यक्तीने वार करून खून केल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पद्माकर घनवट यांनी आरोची माग काढण्यास सुरवात केली.

क्लिक करा आणि वाचा-
तसेच, तक्ररादार व तांत्रिक गोष्टीच्या आधारे तपास केला. त्यावेळी मुलानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. विशाल हा घरातून पैसे चोरत असल्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. तसेच, आई त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांच्यात भांडणे झाली. त्यावेळी मुलगा विशाल याने प्रेयसीसोबत मिळून आईच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here