सोलापूर: मार्चअखेरमुळं नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आता राज्यातील सर्वच प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक कार्यालये सार्वजनिक च्या दिवशीही सुरु राहणार आहेत. याबाबत राज्याचे परिवहन आयुक्त यांनी आदेश काढले आहेत.त्याच आदेशानुसार सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नवीन वाहन नोंदणी, थकीत कर वसुली आणि खटला विभाग सुरु राहणार असल्याचे पत्रक सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी काढले आहेत. ( in the state will remain open even on )

मार्चअखेर असल्याने नामवंत वाहन उत्पादक कंपन्या ग्राहकांसाठी वाहन खरेदीसाठी ऑफर्स जाहीर करत आहेत.त्यामुळं या काळात मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी होत असते.

शिवाय अनेक वाहनांचे टॅक्सही आर्थिक वर्षाखेरमुळं थकलेले असतात.ते वसूल व्हावेत आणि प्रलंबित खटले निकाल काढावेत म्हणून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही कार्यालयात हजार राहून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी कामाचा निपटारा करणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

गुरुवार ११ मार्चला महाशिवरात्री

> शनिवार आणि रविवार 13,14 मार्च साप्ताहिक सुट्टी
> शनिवार आणि रविवार 20, 21 मार्च साप्ताहिक सुट्टी
> शनिवार आणि रविवार 27, 28 मार्च साप्ताहिक सुट्टी
> आणि सोमवार 29 मार्च धुलिवंदन या सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here