म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन नोंदणीनुसार वेळ देऊनही सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला कर्मचाऱ्यांनी लस देण्याबाबत असमर्थता दर्शविली. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे आज लस देता येणार नसल्याचे या ज्येष्ठ नागरिकाला सांगण्यात आल्याने या नागरिकाने नाराजी नाराजी व्यक्त करीत गोंधळ घातला. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला.

जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात आणि ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस देण्यास सुरूवात झाली आहे. सायंकाळी पाचपर्यंत लसीकरणाची वेळ ठेवण्यात आली आहे. याकरीता ऑनलाईन नोंदणी करण्याचा पर्याय देखील नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.

शहरातील रहिवासी अशोककुमार भाटीया यांनी मंगळवारी (दि. ९) पहाटे लसीकरणासाठी स्वत:चे आणि पत्नीच्या नावाची ऑनलाईन नोंदणी केली. त्यांना लसीकरणासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी यावे असा मेसेज पाठविण्यात आला. लसीकरणास येण्यापूर्वी त्यांनी हॉस्पिटलमध्ये संपर्क केला. त्यांना दुपारी ४ वाजेदरम्यान येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भाटीया दांपत्य मुलासवेमत येथील करोना लसीकरण कक्षाजवळ आले. त्यावेळी त्यांना आजचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाटीया यांना संताप अनावर झाला.

क्लिक करा आणि वाचा-

लसीकरणाची वेळ दिली असताना हॉस्पिटल प्रशासन लस देण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्याकडे तक्रार केली. तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्याकडेही तक्रार केली. खासदार गोडसे यांनी प्रशासनाशी संपर्क साधत भाटीयांना लस देण्यास सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here