जळगाव: शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मंगळवारी शहरातील नागरिकांना शिस्त तसेच निष्काळजी लोकांना धडा शिकविण्यासाठी दोन्ही अधिकारी चक्क रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त आयुक्त सतीश कुलकर्णी व उपायुक्त संतोष वाहुळे देखील होते. या अधिकाऱ्यांच्या पथकाने नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, जळगावात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा तीन दिवसांचा जाहीर करण्यात आला आहे. ( Update )

वाचा:

जळगावात दररोज करोना बाधितांची संख्या ३०० ते ५०० ने वाढत आहे. मात्र, त्याचे गांभीर्य अद्याप जळगावकरांना आलेले नाही. बाजारपेठेतील गर्दी कायम आहे. अनेक नागरिक निष्काळजीपणे मास्क न लावता गर्दीत फिरत असतानाचे भंयकर चित्र दिसत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात नसल्यानेच करोना संसर्ग वाढत आहे. अखेर मंगळवारी सकाळी प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन नागरिकांना शिस्तीचे धडे दिले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ भागात पाहणी केली.

या भागात केली पाहणी

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील फुले मार्केट, शिवाजी रोड, दाणा बाजार, सुभाष चौक, चित्रा चौक, नवी पेठ, टॉवर चौक व गोलानी मार्केटमध्ये जावून पाहणी केली.

वाचा:

बाजारपेठेत धावपळ; दुकानदारही धास्तावले

महात्मा फुले मार्केट परिसरातून पाहणीला सुरुवात करण्यात आली. मुख्य बाजारपेठ भागात विना मास्क फिरणाऱ्यांवर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. सर्वच विभागातील मुख्य अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी आल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकच पळापळ सुरू झाली. ज्या दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर गर्दी होती अशा दुकानांमधून दुकानदारांनी ग्राहकांना तत्काळ बाहेर काढले. तसेच फुले मार्केट भागात अतिक्रमण करून दुकाने थाटणाऱ्यांनी देखील अधिकाऱ्यांचा ताफा पाहताच साहित्य जमा करून पळ काढला. तर ज्यांनी मास्क घातला नव्हता त्यांनी अधिकाऱ्यांच्या ताफा पाहताच तोंडावर रुमाल लावण्याची धावपळ चालविली.

वाचा:

पळून जाणाऱ्यांना पकडून केला दंड

फुले मार्केट व गोलानी मार्केट भागात पोलिसांचे पथक पाहताच अनेकांनी पळ काढला. मात्र मास्क न लावणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. तसेच सुभाष चौक, शिवाजी रोड व बळीराम पेठ या भागात अनधिकृतपणे दुकाने थाटत असलेल्या हॉकर्सवर देखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. अनेकांचे साहित्य देखील महापालिका प्रशासनाने जप्त करून घेतले.

वाचा:

५२ जणांना दंड; बँक कार्यालयांना देखील सूचना

विना मास्क फिरत असलेल्या ५२ जणांना जिल्हाधिकारी व आयुक्तांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. नवी पेठ भागातील बँक ऑफ बडोदा मध्ये देखील खातेदारांची मोठी गर्दी जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन बँक मॅनेजरला गर्दी कमी करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या. दुकानदारांना देखील मनपा उपायुक्तांनी सूचना देत नियमांचं पालन करण्यास सांगितले. सात ते आठ दुकानदारांना देखील मनपाने नोटिसा बजावल्या असून यापुढे नियमांचा भंग झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्तांनी दिला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here