मुंबई: जोगेश्वरीतील एका खासगी रुग्णालयात कोविडची लस (Covid Vaccine) टोचून घेतल्यानंतर काही तासांतच ६८ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लस घेतल्यानंतर झालेला मुंबईतील हा पहिलाच मृत्यू आहे. या जेष्ठ नागरिकांचा मृत्यू कसा झाला याची तपासणी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने (BMC) वैद्यकीय तज्ज्ञांची एक समितीनियुक्त केली आहे. याबाबतचा तपास करून ही समिती आपला अहवाल देईल. (a senior citizen of 68 dies after getting in )

८ मार्च या दिवशी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील मिल्लत नर्सिग होममध्ये एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दुपारी साडेतीनच्या सुमारास कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा देण्यात आली. ही लस दिल्यानंतर काही मिनिटांत ते बेशुद्ध होत खुर्चीतून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

मृत्यू पावलेल्या या जेष्ठ नागरिकाला अनेक प्रकारचे आजार होते, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

समिती करणार मृत्यूबाबतचा तपास
या जेष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर नियुक्त करण्यात आलेली तज्ज्ञ वैद्यकिय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही समिती मृत्यू बाबतचे सखोल विश्लेषण करणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here