या वेळी बोलताना त्यांनी सभागहात इंग्रजी शब्दांचा वापर होण्याबाबत भाष्य केले. सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांचा वापर करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मराठीमध्ये शब्द संग्रह असताना देखील इंग्रजीचा वापर करणे हास्यास्पद प्रकार असल्याचे ते म्हणाले.
‘अर्थसंकल्पात मराठी भाषा संवर्धनासाठी एकही शब्द नाही’
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकेचे प्रहार केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक शब्द देखील व्यक्त करण्यात आलेला नाही, असे सांगत रावते यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली.
‘शिवसेनेला मराठीचा एक शब्दही उच्चारता येऊ नये हे दुर्दैव’
मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना रावते यांनी शिवसेनेला घरचा अहेर दिला आहे. मराठी ही राजभाषा आहे. म्हणूनच मराठीचा वापर प्रशासकीय कामकाजात करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव अजूनही तेच आहे. मुंबईत इतर सर्व भाषा आणि परप्रांतीयांसाठीचे भवन उभारले गेले आहे. असे असताना मराठीचे भवन का नाही, असा सवाल करत शिवसेनाला मराठीबाबत एक शब्द उच्चारता आला नाही आणि हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘मी मेल्यावर साहेबांना काय उत्तर देणार?’
दिवाकर रावते पुढे म्हणाले की, ‘आमच्या कॉमन मिनिमम प्रॉग्रॅममध्ये नाही म्हणून औरंगाबादला संभाजी नगर बोलायचे नाही असे बोलल्यावर शांत बसायचे. या अर्थसंकल्पात मराठी विद्यापीठाबाबत तरतूद करण्यात आलेली नाही. आणि मला याबाबत बोलावे लागत आहे हे वाईट आहे.’ मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि अर्थसंकल्पात मात्र मराठीसाठी काहीच नाही, असे नमूद करताना मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं, तर मग मी त्यांना काय उत्तर देणार?, असा सवालही रावते यांनी विचारला.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times