नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी () आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन () यांची शुक्रवारी क्वॉड ऑनलाइन समारंभाग भेट होणार आहे. चार देशांच्या या संघटनेत जपान आणि ऑस्ट्रेलियाही सदस्य आहेत. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हेही या समारंभात सहभागी होतील. चार देशांमधील ही पहिली बैठक आहे.

आपल्याला घेरणारी संघटना या नजरेने चीन क्वॉडकडे बघतो. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेशी अलिकडेच कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर चीनशी तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने क्वॉड संघटनेच्या ऑनलाइन समारंभाबाबत माहिती दिली. क्वॉड देशांची पहिली बैठक १२ मार्चला आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ऑनलाइन होणार आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

चारही देशांचे नेते प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर समान हितसंबंधांसह चर्चा करतील. हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात स्वतंत्र, अखंडित आणि सर्व जहाजांच्या वाहतुकीवर विचारांची देवाण-घेवाण करणार आहेत. चारही देश कोविड -१९ च्या संसर्गावर चर्चा करतील. तसेच हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात लसीची सुरक्षा, एकसमान आणि परवडणारी लस यावर चर्चा करतील.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालायने क्वॉड नेत्यांमधील बैठकीला दुजोरा दिला. एक दिवसापूर्वीच आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांच्यात फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटं झाली. समुद्र किनाऱ्याची सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली. हाँगकाँग आणि ईस्ट चायना सीच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here