वाचा:
सत्तावाटपावरून फिसकटल्यानं शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळं भाजपला महाराष्ट्रासारखं मोठं राज्य गमवावं लागलं. त्यातून अजूनही भाजप सावरलेला नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या मदतीनं पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे. नवाब मलिक यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना यावर भाष्य केलंय. ‘भाजपची लाट ओसरली आहे. एकमागोमाग एक राज्य त्यांच्या हातातून निसटत आहे. दिल्लीतही भाजपचा पराभव होणार आहे. त्यामुळं नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी त्यांना अशा बातम्या पेराव्या लागत आहेत, असं मलिक म्हणाले.
वाचा:
वाचा:
‘भाजपवरून लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यांचे अनेक नेते राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. अर्थात, त्याबाबतचा निर्णय आमच्या पक्षांचे नेते घेतील. भाजपलाही ते कळेलच. महाविकास आघाडीचे सरकार तीन महिन्यांत पडेल, असं फडणवीस म्हणतात. तर, चंद्रकांत पाटील सहा महिन्यात पडेल असं म्हणतात. पण त्यांच्या दाव्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत प्रचार करत आहेत. पण महाराष्ट्रात त्यांची बोट बुडणार आहे,’ असंही मलिक म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times