व आगीमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने यादरम्यान मुंबई पुणे मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रक (क्रमांक-एमएच-४६/बीएफ-७७१३) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दोन्ही मार्गावरील संरक्षक कठडे तोडून विरुद्ध दिशेला मुंबई पुणे मार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरवर (एमएच-१२/एमव्ही-७००४) जोरात आदळला. या अपघातामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामध्ये ट्रकमधील ड्रम गरम होऊन फुटल्याने त्यांचा स्फोट झाल्याने भडकलेल्या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग व खोपोली पोलिसासह देवदूत आपत्कालीन यंत्रणेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत. आग विझविण्यासाठी आयआरबी व खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला प्राचारण करून चार तासांच्या प्रयत्नांनंतर पहाटे पाच वाजता आग आटोक्यात आणली. त्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times