दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, काही प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षांच्या नेत्यांसह जवळपास १२ जणांची नावे या एफआयआरमध्ये आहेत. मंगळवारी रात्री मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डेलकर यांचा मुलगा अभिनव याने यासंदर्भात ही माहिती दिली.
खासदार डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलात आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये अनेकांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणी आता मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणाही गृहमंत्री देशमुख यांनी केली होती.
‘दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत दादरा नगरा हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचे नाव आहे. त्यांच्या दबावामुळे मला त्रास दिला जात असून माझे सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या मला दिल्या गेल्या, असा उल्लेख चिठ्ठीत आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना पटेल हे गृहमंत्री होते,’ असे गृहमंत्री देशमुख यांनी काल सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times