मुंबई: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात () विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर चौफेर हल्ला चढवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते () आणि माजी अर्थमंत्री (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळांवरून सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी केलेल्या शायरीमुळे सभागृहात विरोध विरुद्ध सरकार असा मनोरंजक सामनाही पाहायला मिळाला. मुनगंटीवार यांच्या या शायरीद्वारे केलेल्या हल्ल्याला गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांनी शायरीद्वारे उत्तर दिले. ( criticizes govt and home minister gives reply)

आज विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री यांनी हल्ला-प्रतिहल्ला चढवला. यावेळी दोघांनीही शायरीचा चपखल उपयोग केला. सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून गृहमंत्री देशमुख म्हणाले, ‘सुधीरभाऊ, आपल्याला पाहून मला प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंह यांची एक गझल आठवली. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो… सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम हैं जिस को छुपा रहे हो?.’ गृहमंत्री देशमुख यांनी या ओळी सांगत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसून देशमुख यांना प्रतिसाद देत होते.

त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांच्याच शैलीच त्यांना उत्तर द्यायला सुरू केले. यावेळी मुनगंटीवार यांनी शेरोशायरीच्या ओळींचा आधार घेतला. मुनगंटीवार म्हणाले, ‘कुछ देर की खामोशी हैं, फिर से शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा हैं, हमारा दौर फिर से आयेगा.’

क्लिक करा आणि वाचा-

मुनगंटीवार यांनी या ओळी उच्चारताच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात हा शेर सादर केल्यानंतर विधानभवनात एकच चर्चा रंगली. ‘तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा हैं’, या मुनगंटीवारांच्या वाक्यामुळे चर्चेला एक दिशा मिळाली. सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्याचा काळ उरला आहे, असे का म्हटले असावे, अशी चर्चा जो-तो करू लागला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे का?… तीन महिन्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here