म. टा. प्रतिनिधी, : २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका आरोपाखाली २० वर्षे न्यायासाठी लढावे लागले. या २० वर्षांत सिमीसारख्या प्रतिबंधित संघटनेशी नाव जोडले गेल्यामुळे वैयक्तिक आणि कौटुंबिक हानी आणि समाजात बदनामी सहन करावी लागली. शेवटी सत्याचाच विजय झाला. कोर्टाने सर्व आरोपांतून मुक्त केले, अशी प्रतिक्रिया जियाउद्दीन सिद्दीकी आणि अब्दुल रज्जाक यांनी दिली.

जियाउद्दीन सिद्दीकी आणि अब्दुल रज्जाक यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर २००१ मध्ये गुजरात येथील नवसारी बाजार येथील एका हॉलमध्ये अखिल भारतीय अल्पसंख्याक शिक्षा बोर्ड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ४०० जणांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी १२७ जण पोहोचले होते. या कार्यक्रमास्थळी पोलिसांनी छापा मारून १२७ जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांवर सिमीसारख्या प्रतिबंधित संघटनेसाठी संलग्न असल्याचा आरोप करण्यात आला होता. यात १२७ मध्ये ४४ महाराष्ट्र, २५ गुजरात, मध्य प्रदेशचे १३, कर्नाटक ११, उत्तरप्रदेश १०, राजस्थान ९, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू येथील प्रत्येकी ४, बिहार २ आणि छत्तीसगड येथील एक व्यक्तीचा समावेश होता. सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर गेल्या वीस वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष केला.

६ मार्च २०२१ रोजी कोर्टाने १२७ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या २० वर्षांत या खोट्या गुन्ह्यामुळे आमचे सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर खूप मोठे नुकसान झाले आहे. अखेर सत्याचाच विजय झाल्याची प्रतिक्रिया जियाउद्दीन सिद्दीकी आणि अब्दुल जावेद यांनी दिली.

नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी

खोट्या आरोपामध्ये अडकवून जिवनातील २० वर्षे न्यायासाठी भटकंती करावी लागली. या काळात सामाजिक बहिष्काराचाही सामना करावा लागला. तसेच आर्थिक नुकसानही झालेले आहे. यामुळे खोट्या केस दाखल करणाऱ्या संबंधित एजन्सीकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी असल्याची माहिती जियाउद्दीन सिद्दीकी यांनी दिली. याबाबत ज्येष्ठ विधीज्ज्ञ यांचा सल्ला घेऊन ही याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here