जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी येत्या काळातील सर्व सार्वजनिक उत्सव तसेच सण यामध्ये होळी, धुलिवंदन सर्वांनी साधेपणाने व घरीच साजरे करण्याचे आवाहन केले आहे. दि. २८ मार्च २०२१ रोजी होळी व दि २९ मार्च २०२१ रोजी धुलीवंदन उत्सव सण साजरा होत असून हे उत्सव कार्यक्रमात नागरिक मोठया प्रमाणात एकत्रित येऊन गर्दी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासनाने करुन दिलेल्या एसओपीचे पालन गर्दी एकत्रित झाल्याने होणार नाही. त्याअनुषंगाने होळी, धुलीवंदन सण कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसंच, चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील दरवर्षी होणाऱ्या यात्रेला दररोज १२०० ते १५०० च्या संख्येत भाविक दर्शनाकरीता गर्दी करीत आहेत. ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र असल्याने दरवर्षी प्रमाणे हजारोंच्या संख्येने भाविकांची दर्शनाकरीता गर्दी होण्याची दाट शक्यता असून मोठया प्रमाणात गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्यानं. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव देवस्थान, दि.१० मार्च २०२१ ते १७ मार्च २०२१ पर्यंत मार्कंडेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.
आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times