वाचा:
करोनाचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह करून घेणारा आमदार मंगळवारपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकारावर आधीच गंभीर चर्चा झाली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यंनी आज हा मुद्दा विधान परिषदेत मांडला व तीव्र संताप व्यक्त केला. या आमदाराचा नामोल्लेख टाळत अजित पवार यांनी आपलं म्हणणं मांडलं. करोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह दाखवून एखादा सदस्य जर सभागृहात उपस्थित राहत असेल तर ही बाब गंभीर आहे. त्यासाठी अशा सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी सभापतींकडे केली.
वाचा:
काय आहे नेमकं प्रकरण?
भाजपचे विधान परिषद सदस्य हे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असतानाही सभागृहात आले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य यांनी मंगळवारी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परिचारक यांचा अहवाल पॉझिटिव्ह असताना तो निगेटिव्ह करून देण्यात आला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी शिंदे यानी केली होती. त्यावर परिचारक यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. २८ फेब्रुवारी रोजी माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी मी पुन्हा चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. एकदा नव्हे सलग तीन वेळा माझ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतरच मी सभागृहात उपस्थित राहिलो. याबाबत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही मी अवगत केले होते, असे परिचारक यांनी सांगितले. दुसरीकडे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मात्र ही बाब गांभीर्याने घेत याबाबत विधीमंडळ सचिवालयाने चौकशी करायला हवी, असे नमूद केले होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times