स्टॉकहोम: स्वीडनमधील ट्रक आणि बस निर्माती कंपनी स्कॅनियाने भारतातील सात राज्यांमध्ये कंत्राट मिळवण्यासाठी २०१३ ते २०१६ या दरम्यान लाच दिली असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. स्वीडनमधील वृत्तवाहिनी एसव्हीटी आणि अन्य दोन माध्यम संस्थांसोबत केलेल्या वृत्तांकनाच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. एसव्हीटी, जर्मन ब्रॉडकास्टर झेडडीएफ आणि भारतातील कॉन्फ्लूएंस माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका भारतीय मंत्र्यालाही लाच देण्यात आली.

या मंत्र्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. तर, भारत सरकारच्या प्रतिनिधींनी याबाबत कार्यालयीन वेळेशिवाय बोलण्यास नकार दिला असल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी २०१७ मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांचीही चूक असल्याचे आढळून आले. फॉक्सवेगन एजीचे व्यावसायिक वाहन आर्म Traton SE युनिट आहे. या युनिटने २००७ मध्ये काम सुरू केले होते. तर, २०११ मध्ये उत्पादन सुरू करण्यात आले. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, यामध्ये लाच देणे, व्यावसायिक भागिदाराच्या माध्यमातून लाच देण्याचेही आरोप होते. त्यानंतर स्कॅनियाने भारतीय बाजारपेठेत बस विक्री बंद केली आणि कारखानाही बंद केला.

वाचा:

वाचा:

करार रद्द

सीईओ हेनरिक हेनरिक्सन यांनी एसव्हीटीला सांगितले की, आम्ही भारतात मोठे यश मिळवू इच्छित होतो. मात्र, आम्ही त्यात किती जोखीम आहे, याचे आकलन करू शकलो नाही. भारतात काही लोकांनी चूक केली. या लोकांनी नंतर कंपनीही सोडली. त्याशिवाय ज्या व्यावसायिक भागीदारांसोबत करार करण्यात आले होते, ते रद्द करण्यात आले आहेत.

वाचा:
लायसन्स प्लेट बदलून विकण्याचा डाव

समोर आलेल्या वृत्तानुसार, स्कॅनियाने ट्रक मॉडल्समध्ये ही फसवणूक केली. लायसन्स प्लेट बदलून ट्रक भारतीय खाण कंपन्यांना विकण्याचा प्रयत्न केला. हा करार १.१८ कोटी डॉलरमध्ये होणार होता. स्कॅनियाचे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा पुरावा आहे. मात्र, कंपनी कठोर कारवाई करू शकेल इतके सबळ पुरावे नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here