आम्ही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढेले आहेत. सरकारकडे कोणत्याही प्रश्नाचे कोणतेही उत्तर नाही, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री हेच सचिन वाझेंचे वकील
आपल्या पतीची हत्या पोलिस अधिकारी यांनीच हत्या केल्याचा मनसुख हिरन यांच्या पत्नींनी केला आहे. सचिन वाझे यांना वकिलाची आवश्यकता नाही. याचे कारण म्हणजे सचिन वाझे यांचे वकील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वकील आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे सचिन वाझेंचा बचाव करत होते. सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे असताना देखील त्यांचा बचाव करावा लागतो. याचा अर्थ काय असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.
राठोडांचा राजीनामा घेतला, वाझेंचा का नाही?
संजय राठोंडांचा राजीनामा घेतला जातो, मात्र सचिन वाझेंचा राजीनामा घेतला जात नाही. याचे कारण काय? याचे कारण म्हणजे
एपीआय वाझेंकडे अशी नक्कीच कोणती तरी माहिती आहे, की ज्यामुळे ते या सरकारला घालवू शकतात. म्हणूनच त्यांना वाचवले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत, अशा शब्दांतही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. या सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत जागा कमी केल्या असून मराठा आरक्षणाचा नवा घोळ घातला आहे. दोन्ही आरक्षणे अडचणीत आणण्याचे काम या सरकारने केले आहे. या सरकारचा चेहरा उघडा झाला, अशी टीका करताना हे सरकार कोणालाही न्याय देऊ शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times