मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाले आहेत. यानंतर वाझे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारच्या अडतणीत वाढ झाली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधक या प्रकरणावरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेत सरकारने सचिन वाझे यांची गुन्हे शाखेमधून बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनंतर सचिन वाझे यांनी हा दावा केला आहे.
एका अज्ञात कार आपला पाठलाग करत आहे असे वाझे यांचे म्हणणे आहे. पाठलाग करणाऱ्या या गाडीवर पोलिस असे लिहिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या गाडीचा नंबर मात्र बनावट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याच प्रमाणे या गाडीच्या पुढील नंबर वेगळा आहे आणि मागील नंबरही वेगळा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे पाहता ही पाठलाग करणारी गाडी नेमकी कोणाचा आहे आण ती माझा पाठलाग कशासाठी करत होती, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. या प्रकरणी सचिन वाझेंना विरोधी पक्षांनी लक्ष्य केले असून ते अडचणीत आले आहेत. त्यानंतर त्यांचा गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली. वाझे यांच्याविरोधात पुरावे असताना देखील त्यांना पदावर कायम ठेवले जाते याचे कारण काय, असा सवाल भाजपने केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सचिन वाझेंकडे अशी माहिती असेल, ज्या माहितीमुळे हे सरकार पडू शकते. याच कारणामुळे सचिन वाझे यांना वाचवले जात आहे, असा थेट आरोपही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times