वाचा:
मुख्यमंत्री यांनी आजच राज्यातील स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सरकारची पुन्हा लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही मात्र नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे विधान करत मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे सूचक इशाराच दिलेला आहे. असे असतानाच आजची आकडेवारी हाती आली असून त्यातील आकडे काळजीत भर टाकणारे ठरले आहेत. राज्यात आज गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ पाहायला मिळाली आहे. २४ तासांत तब्बल १३ हजारांवर नवीन बाधितांची भर पडली आहे.
वाचा:
राज्यात आज ५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता ५२ हजार ६१० इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.३४ टक्के एवढा आहे. आज राज्यात १३ हजार ६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ९ हजार ९१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण २० लाख ९९ हजार २०७ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७१ लाख १५ हजार ५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ५२ हजार ५७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७१ हजार १८७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार २४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या लाखाच्या अगदी जवळ पोहचली आहे. आज हा आकडा ९९ हजार ८ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यात पालिका हद्दीत १ हजार ५३९, पालिका हद्दीत १ हजार ५१३ तर पालिका हद्दीत १ हजार ३८४ नवीन बाधितांची भर पडली आहे. या शिवाय पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या शहरांतही करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ४७४ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात १२ हजार ७२४ रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात हा आकडा १० हजार ४६० इतका आहे तर मुंबईत ९ हजार ९७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times