म. टा. प्रतिनिधी,

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात दुकानावर कन्नड बोर्ड (Kannad Board) लावल्यास ते दुकानच बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेने (Shiv Sena) दिला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बहुतांशी कन्नड हटावचा नारा देत अशा कन्नड बोर्डला काळे फासत ते फाडून टाकले. कर्नाटकात मराठी बांधवांवर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. ( activists blackened and tore down most of the )

कोल्हापूर शहरातील अनेक दुकानावर कन्नड भाषेतील फलक आहेत. कन्नड भाषिकांना आकर्षित करून घेण्यासाठी हे फलक लावण्यात आले आहेत. कोल्हापूरातील शिवसेनेने या विरोधात मोहीम सुरू केली आहे. बेळगावात कन्नड वेदिके संघटनेने महापालिकेवर भगवा ध्वज काढून लाल पिवळा ध्वज लावला. शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला. सीमाभागात सर्वत्र कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. यामुळे मराठी माणसांची गळचेपी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने कन्नड फलकाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शिवाजीराव जाधव, शशी बिडकर, स्मिता सावंत यांच्यासह अनेकांनी बुधवारी दिवसभर शहरातील अनेक दुकानासमोरील कन्नड फलकावर काळे फासले. असे फलक लावणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे अनेक ठिकाणी वादावादी झाली. काही कन्नड फलक फाडून टाकले. यापुढे जिल्ह्यात असे फलक दिसल्यास दुकान बंद करू असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या आंदोलनात माजी आमदार सुरेश साळोखे, हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, राजू यादव, विराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here