शरद पवार आणि यांच्या भेटीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली. त्याच प्रमाणे डेलकर, मनसुख हिरन आणि वाझे प्रकरणावर देखील या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच प्रमाणे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणावर देखील दोघांची चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नांगरे पाटील हे पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटके भरलेली कार सापडणे आणि त्यानंतर मनसुख हिरन यांचा मृत्यू होणे आणि त्यात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप होणे यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. सचिन वाझे यांचा या प्रकरणाशी कशा प्रकारचा संबंध आहे यावर पवार आणि नांगरे पाटील यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
या भेटीत पवार यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चर्चा केली असावी असेही बोलले जात आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times