मुंबई: ठाण्यातील व्यापारी यांच्या मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस अधिकारी यांची आज मुंबई क्राइम ब्रांचमधून बदली करण्यात आली असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांना ते उद्या उत्तर देणार आहेत. तसे त्यांनीच आज प्रसारमाध्यमांना सांगितले. ( )

वाचा:

उद्योगपती यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ कार स्फोटकांसह आढळली होती ती कार मनसुख हिरन यांची होती. त्यामुळे मनसुख यांची पोलीस चौकशी सुरू होती. दरम्यान अचानक त्यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथील खाडीत रुतलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुरुवातीला मुंबई क्राइम ब्रांचकडून तपास सुरू होता. नंतर हा तपास दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसने मनसुख यांची पत्नी विमला यांचा जबाब नोंदवून घेतला असून त्यात त्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूस सचिन वाझे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मनसुख यांची कार नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान सचिन वाझे यांच्याकडे होती, असा दावाही विमला यांनी केला आहे. त्याआधारावर विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेत थेट सचिन वाझे यांचे नाव घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या. सचिन वाझे आणि मनसुख हिरन यांच्यातील संवादाचा सीडीआरही आपल्याकडे असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले व हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, असा दावा केला. ही सारी बाब गंभीर असून वाझे यांना निलंबित करण्यात यावे आणि गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. सरकारने ही मागणी फेटाळली मात्र वाझे यांची आज मुंबई क्राइम ब्रांचमधून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

वाचा:

सचिन वाझे यांच्या बदलीची गृहमंत्री यांनी घोषणा केल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. वाझे यांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तिथे तब्बल अडीच तास वाझे आणि पोलीस आयुक्तांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी वाझे यांना गाठले असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं. ‘मी आज काहीही बोलणार नाही. माझे जे काही म्हणणे आहे ते मी उद्या तुमच्यासमोर मांडणार आहे’, असे वाझे यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेणार का?, उद्या किती वाजता बोलणार?, असे प्रश्न विचारले असता उद्या दिवसभरात कधीही माझे अधिकृत स्टेटमेंट मी देईन, असे वाझे म्हणाले. माझ्यावर जे काही आरोप झाले आहेत त्या सर्वावर मी स्पष्टीकरण देईन, असे नमूद करताना विधीमंडळ हे राज्याचं सर्वोच्च सभागृह असल्याने तिथल्या कामकाजात जे काही झालं त्यावर मी बोलणार नाही, असेही वाझे यांनी नमूद केले.

वाचा:

दरम्यान, मनसुख हिरन प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. त्यात मनसुख यांच्या पत्नीचा जबाबही वाझेंच्या विरोधात असल्याने वाझे उद्या नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here