वाचा:
मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षाने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली असून वाझे यांची तूर्त बदली करण्यात आली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली. आधी फाशी आणि नंतर चौकशी हे आम्हाला मान्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावून सांगितले. दरम्यान, यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. सचिन वाझे यांना आता वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, असे फडणवीस म्हणाले. त्याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे मंत्री अॅड. अनिल परब यांनी विरोधी पक्षाला जल्लादाची उपमा देत तोफ डागली आहे.
वाचा:
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलं. साधारणपणे अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा होते. विरोधी पक्ष त्यातील उणिवा दाखवतो, काही सूचना करतो आणि सरकारला मार्गदर्शनही करतो पण यावेळी विरोधी पक्षाने अधिवेशनावर नव्हे तर केवळ सचिन वाझे यांच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती त्याचा राग काढण्याचे काम विरोधी पक्षाने अधिवेशनात केले. सचिन वाझे यांना निलंबित करा, वाझे यांना बडतर्फ करा, वाझे यांना अटक करा, अशा घोषणा देत विरोधकांनी कामकाज थांबवले. आज तर सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही, मुख्यमंत्रीच त्यांचे वकील आहेत व ते वाझे यांना वाचवत आहे, असे विधान विरोधी पक्षनेत्यांनी केले आहे, असे नमूद करत परब यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना सचिन वाझे यांचे वकील म्हणत असाल तर चौकशीआधी एखाद्याला शिक्षा द्यायला सांगणारा विरोधी पक्ष जल्लादाची भूमिका निभावत आहे आहे का?, असा सवाल परब यांनी केला. सचिन वाझे यांच्यापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विरोधकांना जल्लादाच्या भूमिकेत पाहून आम्हाला फार वाईट वाटले, असा टीकेचा बाणही परब यांनी सोडला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times