सोलापूर: ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) मासिक सर्वसाधारण सभेची पहिली बैठक घेण्यास मज्जाव करत नवनिर्वाचित सरपंचालाच बेदम मारहाण करण्यात आलीय. ही घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे घडली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गावातीलच पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( of beaten in solapur)

गेल्या २३ फेब्रुवारीला सय्यद वरवडेच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली होती. गावगुंडीतील अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत परस्पर विरोधी दोन्ही पॅनलना काटावरचं बहुमत मिळालं होतं. निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित सदस्यांचं पर्यटन घडविण्यात आलं होतं. जुगडाच्या राजकारणात सरपंच म्हणून वाल्मिकी जालिंदर निळे यांची सरपंच तर उपसरपंच म्हणून पमाबाई शंकर कोरे यांची बहुमताने निवड झाली होती.

त्यानंतर आज गावात ग्रामपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सदस्य येत असताना सरपंचांना ‘तू मिटींगला आत जायचे नाही’ म्हणत गावगुंडांनी ग्रामपंचायतीच्या दारातच सरपंच वाल्मिकी निळे यांना बेदम मारहाण केलीय. याचवेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या शिवराज निळे यांनाही मारहाण करण्यात आलीय.

क्लिक करा आणि वाचा-

सदरचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम,सोमनाथ विलास विरपे आणि बाळू भिवा कदम या पाच जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मोहोळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here