वाचा:
मुकेश अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकारची आणि त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी?, असा प्रश्न नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.
वाचा:
२००९ मध्ये यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून आमदारांनी या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.
वाचा:
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत मुकेश अंबानी यांच्या या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह एक स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यात संबंधित स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरन यांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने दोन्ही घटनांचा तपास एटीएसकडे दिला असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने यात एंट्री घेत स्फोटकांप्रकरणी तपास राष्टीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्य विधीमंडळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्ष भाजपने सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यावरूनच नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी या विषयी बोलताना भाजपवर पलटवार केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times