नवी दिल्ली: देश हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी कधी होणार, हे आजही निश्चित होऊ शकले नाही. फाशीची नवी तारीख निश्चित करण्यात दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने आज नकार दिला. एखाद्याकडे जोपर्यंत कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, तोपर्यंत त्याला फासावर चढवणे पाप आहे, अशी टिपण्णीही कोर्टाने केली. दोषींना कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून ती बाबही कोर्टाने अधोरेखित केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times