वाचा:
काँग्रेस, आणि शिवसेना या तीन पक्षांनी स्थापना केल्यानंतर राज्यातील काही अन्य पक्षही यामध्ये सहभागी झाले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, शेकाप, लोकभारती व रिपाइं कवाडे गटाचा समावेश आहे. पहिल्या दिवसापासून हे घटकपक्ष आघाडी सरकारवर नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकीत या घटकपक्षांना गृहित धरण्यात आले. दीड वर्षात एकदाही या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली नाही. सरकार स्थापन करताना दिलेला शब्द पाळला जात नसल्याने हे सर्वच घटक पक्ष विरोधी सूर आळवत आहेत.
वाचा:
तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त करू लागली आहे. विधानसभेत या संघटनेचा एक आमदार आहे. राज्यपाल नियुक्त बारा सदस्य नियुक्तीच्या प्रस्तावात संघटनेचे राजू शेट्टी यांचे नाव आहे. पण ही नियुक्ती राज्यपालाकडून थांबली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही दिवस संघटनेने सरकारच्या विरोधात आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. केवळ इशारे न देता थेट रस्त्यावरची लढाईदेखील सुरू करताना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले. ऊसाला एफआरपी देताना तुकडे पाडू नका, या मागणीसाठी संघटना आक्रमक झाली आहे. ज्या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झाले, त्यांच्या विरोधात सत्तेत राहून आंदोलन केले जात असल्याने संघटनेच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
वाचा:
केंद्रातील सरकारसोबत असतानाही शेट्टी सतत त्यांच्या विरोधात मत मांडत होते. त्यांना सोडून महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर आता ते या आघाडी सरकारला धारेवर धरत आहेत. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर त्यांनी जोरदार टीका केली. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे म्हणून ते सरकारच्या विरोधात लढत आहेत. वीज कनेक्शन कट केल्यास हात कलम करण्याची भाषा वापरत आहेत. कर्जमाफीच्या धोरणाबाबतही ते सरकारवर तुटून पडत आहेत. सरकारच्या बहुतांशी धोरणांवर ते टीका करत असल्याने त्यांचा हा घरचा आहेर महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणणारा ठरत आहे.
सत्तेपेक्षा आम्हाला शेतकरी आणि सर्वसामान्य जनता महत्त्वाची आहे. ज्यांच्यासाठी आम्ही सत्तेत गेलो, त्यांचेच प्रश्न सुटत नसतील तर आम्ही सरकारच्या विरोधात बोलणार. राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता प्रसंगी यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेऊ – राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times