कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( ) यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. नंदीग्रामच्या बिरुलीयामध्ये प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेत जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात आणण्यात आलं. त्यांच्यावर आता कोलकात्यातील एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण भाजपने हा एक निवडणुकीतील स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस आणि माकपनेही टीका केली आहे. यावेळी जनता ममतांच्या जाळ्यात फसणार नाही, असं ते म्हणाले.

शेकडो सुरक्षा रक्षक, मग कसा काय झाला हल्ला?

ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत शेकडो जवान तैनात असतात. अशा परिस्थिती ममतांना जवळ येऊन कोणी धक्काबुक्की करत असेल तर ही घटना त्यांच्याच सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. घटनेवेळी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. खरंच असं असेल तर ही घटना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आहे, असं बोललं जातंय. आता या घटनेवरून विरोधी पक्षांनी ममतांना टीकेचं लक्ष्य करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. आता मुख्यमंत्रीच आपल्या राज्यात सुरक्षित नाही तर मग ममता बॅनर्जी बंगाल कसे काय चालवत आहेत? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.

ममतांवर हल्लाच काय त्यांना कोणी स्पर्शही करू शकत नाहीः भाजप

ममता बॅनर्जी या एका सामान्य घटनेचं राजकीय भांडवल करत आहेत. दुखापत झाल्याच्या बहाण्याने नाटक करत आहेत. ममता बॅनर्जींच्या सुरक्षेसाठी ३०० ते ४०० सुरक्षा रक्षक असतात. तसंच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कवचही त्यांना असते, मग हल्ला कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

ममतांना नाटक करण्याची सवय, कुणीच विश्वास ठेवू नकाः काँग्रेस

ममता बॅनर्जांचे हे सर्व नाटक आहे. त्यांना नाटक करण्याची सवय आहे. ममता बॅनर्जी या कुणी नेत्या नाही तर मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर हल्ला होतो आणि पोलिसही तिथे पोलिस नसतात म्हणजे आश्चर्याची बाब आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचेच पोलिस नाहीत. यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत, असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले. तर नंदीग्राममधील माकपच्या उमेदवार मीनाक्षी मुखर्जी यांनीही ममतांवर टीका केली आहे. यावेळी जनता फसणार नाही, असं मीनाक्षी मुखर्जी म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here