मुंबई: राज्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून काही जिल्ह्यांत सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन जनता कर्फ्यू, नाइट कर्फ्यू, लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, हा कळीचा प्रश्न बनला असून याबाबत मुख्यमंत्री यांनी आज पुन्हा एकदा सरकारची याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ( )

वाचा:

राज्यात करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे, याकडे लक्ष वेधत करोनाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार का, असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी लॉकडाऊन करण्याची सरकारची तरी इच्छा नसल्याचे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. करोनाचे रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत व लॉकडाऊन टाळायला हवा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

वाचा:

…तरच रिफायनरी प्रकल्प होईल: मुख्यमंत्री

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत सरकारची भूमिका मांडली. आव्हानात्मक स्थितीतही अर्थसंकल्पीय अधिवेशन व्यवस्थित पार पडलं, त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो, असे सुरुवातीलाच मुख्यमंत्री म्हणाले. प्रकल्पासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे तिथे होणारा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. आता नाणार सोडून अन्यत्र रिफायनरी प्रकल्प होणार असेल व त्याला स्थानिकांचा विरोध नसेल तर मग आमची कोणतीच हरकत नाही. आम्ही प्रकल्पांच्या विरोधात कधीच नव्हतो पण त्यासोबतच पर्यावरणाचाही विचार व्हावा या मताचा मी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कांजूरमार्ग येथे होणे हे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा विषय सध्या कोर्टात आहे आणि कोर्टात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here